सायबर हल्ल्याची समज
Understanding Cyber Attacks
डॉ. सुरेश एच. मिलमिले
सहाय्यक प्राध्यापक
आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर, जि.चंद्रपूर
ईमेल sureshmilmile@gmail.com Mob. 9420554800
सायबर गुन्हा ही गुन्हेगारी क्रिया आहे. ज्यामध्ये संगणक नेटवर्क किंवा नेटवर्क उपकरण समाविष्ट आहे. बहुतेक सायबर गुन्हे नफा कमविण्यासाठी करतात. सध्या लोक कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलचा सर्रास वापर करीत आहेत. सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहेत. भारतात ही क्रांती वेगाने होत आहे. याच बरोबर सायबर गुन्हेगारीही वेगाने वाढत आहे. अस म्हणतात किंवा आख्यायीका आहे की, धरती पुर्वी शेषनागाच्या फन्यावर उभी होती. त्यानंतर माणसाची विकासासोबत संकल्पना बदलल्या, कालांतराने ती माणसाच्या मनगटावर उभी आहे. माणसाचा पुन्हा विकास झाला आज धरती असे म्हणतात की, इंटरनेटच्या जाळयावरती उभी आहे. इंटरनेटच्या तंत्रज्ञानाने मानवाला एका सेकंदात संपूर्ण जगाची माहिती मिळू शकते. चांगल्या कामासाठी व प्रामाणिकतेने जिवन जगण्यासाठी याचा वापर केला तर स्वर्गीय सुख इथेच आहे. परंतू विकासासोबत तेवढीच कमालीची वाढ सायबर गुन्हेगारीमध्ये झालेला आहे. याचे मुख्य कारण आहे, लोकांमध्ये सायबर सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक असणाÚया माहितीचा अभाव सायबर गुन्हाविषयी अनेक घटना कानावर येतात. भारत इंटरनेट वापरात दुसÚया क्रमांकावर आहे. मात्र सायबर सुरक्षेच्या बाबतीत पिछाडीवर आहे. सायबर गुन्हे हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवादच आहे. सायबर गुन्हयाविषयी अनेक घटना कानावर पडतात. काही आप्तस्वकीयांसोबत फसवेगीरीच्या घटना होतांना दिसतात. मोबाईलवरून असं बोलल्या जाते, फोन येतो की, मी बॅंक मॅनेजर बोलतो आपले अकाऊंट बंद होत आहे. चालू ठेवण्याकरीता तुमच्या एटीएम चा सोळाअंकी नंबर सांगा तो सांगिल्यानंतर एक ओटीपी येईल, तो सांगा तो सांगितल्यानंतर पैसे अकाऊंट मधून काढल्या जाते. क्रेडीट कार्ड संबंधात लिंक पाठविल्या जाते. लिंक ओपन करून काही माहिती भरली, पैसे कटतात, फसवणुक होते. एखाद पार्सल आपल्याला आलेलं असतं अशी बतावणी करून त्याची रक्कम दिलेली आहे फक्त ओटीपी सांगा आणि ओटीपी सांगितला व आर्थिक फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले. अशा वेगवेगळया प्रकारच्या अनेक घटना समाजात घडतांना दिसतात.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0066
Download