पोक्सो कायदा–2012 बाल लैंगीक गुन्हांचे सरंक्षण
डॉ. रमेश काशीराम शेन्डे
मा. अं. मुंदाफळे समाजकार्य
महा. नरखेड जि. नागपूर. 441304.
मो. नं. 9423604723
Email- rkshende70@gmail-com
प्रस्तावना- पोक्सो कायदा म्हणजे लैंगिक गुन्हांपासून बालकांचे सरंक्षण कायदा-2012, हा कायदा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण करण्यासाठी आणि अषा घटनेतील गुन्हेगारांना षिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली तयार केलेला कायदा आहे. भारतात जगातील सर्वात जास्त बालके राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील बालकांची संख्या 47.02 कोटी इतकी आहे, त्यांत मुलीची संख्या 22.5 कोटी इतकी आहे. भारतीय घटलेच्या कलम 21 नुसार भारतले भारतीय नागरिकांना बालकांच्या सरंक्षणाची खात्री दिलेली आहे. तसेच सयुक्त राश्टसंघाच्या बालहक्क जाहिरनाम्यावर सुध्दा भारताने 11 डिसेबर 1992 रोजी स्वाक्षरी केलेली आहे. भारतातील बालकांवरिल लैंगिक अत्याचार विरोधी कायदे देषाच्या बालक संरक्षण धोरणाचा भाग म्हणून अधिनियमित करण्यात आले होते. राश्टीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार एकून बालकापैकी 24/ बालकांवर लैंगिक अत्याचार होतात, त्यांतील निम्मे अत्याचार बालकांच्या विष्वासातील प्रौढ व्यक्तींनी केलेले असतात. त्यामुळे एक स्वतंत्र कायदा करण्याची गरज होती.भारतीय संसदेने लैंगिक गुन्हांपासून बालकांचे संरक्षण विधेयक 2011 मध्ये पारित केले आणि 22 मे रोजी त्याचे कायद्यात रूपातर झाले. या कायद्यानुसार तयार करण्यात आलेले नियम सुध्दा नोव्हेबर 2012 मध्ये अधिसूचित करण्यात आले आणि हा कायदा अंमलबजावणीसाठी तयार झाला.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0064
Download