सायबर गुन्हे कायदा आणि न्याय

सायबर गुन्हे कायदा आणि न्याय

Dr. Iliyas G Bepari

Associate Professor

Athawale College of Social Work, Bhandara

Iliyasbepari0786@gmail.com

गोषवारा

      आज आज जगात सर्वात वेगाने वाढणारी गुन्हेगारी म्हणजेच सायबर गुन्हेगारी होय. यामध्ये संगणक किंवा मोबाईल द्वारे इंटरनेटचा वापर करून लोकांची ऑनलाईन फसवणुक केली जाते. सायबर अधिनियमित गुन्हयामध्ये ऑनलाईन संग्रहित केलेली गोपनिय व महत्वपूर्ण माहिती चोरली जाते. सायबर गुन्हेगार संगणक प्रणाली किंवा नेटवर्क हॅक करण्यासाठी अनेक पध्दतीचा वापर करतात. यामध्ये हॅकिंग, त्रासदायक व्हायरस पसरविणे आणि दुर्भावना पूर्ण ऑनलाईन सामग्री, ऑनलाईन घोटाळे आणि फसवणूक, ओळख चोरी, संगणक प्रणाली वर हल्ले आणि बेकायदेषीर किंवा प्रतिबंधीत ऑनलाईन सामग्रीचा वापर करण्यात येतो. पीडीतांच्या गोपनियतेचे आणि अधिकाराचे संरक्षण कायदेषीर समुदायाचे सायबर गुन्हेगारा विरूध्द तयार केले आहेत. तत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा अगर संकल्पनाचा वास्तव जीवनात वापर करणे होय. तंत्रज्ञानाचा मुळ उद्देष कामात सुलभता आणणे हा असते. तंत्रज्ञानमुळे कामाची अचुकता आणि वेग वाढतो. कामाची गुणवत्ता ,कार्यक्षमता, सुरक्षितता वाढते. परंतु तंत्रज्ञानामुळे जसे देषाच्या विकासाकरिता  फायदे झाले, तसेच काही तोटे सुध्दा दिसून येते. यामध्ये सायबर गुन्हे ही संकल्पना समोर आली. प्रत्येक देषात सायबर गुन्हयांचे प्रकार व प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम देषांच्या सुरक्षितता व कायदा यावर प्रभाव पडतो. सायबर गुन्हयामध्ये उदा. बाल लैगिंक चित्रण, प्रताधिकार भग, हॅकिंग, गोपनिय माहिती चोरणे इत्यादी छळ. सायबर पॉर्नोग्राफ इत्यादीचा समावेष होतो.

कळीचे षब्द – सायबर गुन्हेगारी, कायदे , न्याय, सायबर गुन्हेगारीचे प्रकार

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0061

Download