सायबर गुन्ह्याची समस्या व आव्हाने
परमानंद उके (सहाय्यक प्राध्यापक)
डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा
मो. नं. 8600817556
Mail ID : pbukey10@gmail.com
गोषवारा
आजच्या युगामध्ये संगणकाचा वापर मोठ्याा प्रमाणात वाढलेला असून डीजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक व्यवहार कॅषलेष पद्धतीने करणे सुलभ झाले. डीजीटल प्रगतीमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनातील इतर भौतिक सुखसोयींची व्यवस्था सुलभ झाली. परंतु त्याच बरोबर सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही तेवढ्यााच प्रमाणात वाढले. सायबर गुन्हेगारी ही केवळ आर्थिक व्यवहारापूरती मर्यादित नाही. त्याचे प्रमाण हेरगीरी, महŸवाची माहीती हॅक करणे, सुरक्षा भेदने, सोषल मिडीयासारख्या माध्यमातून बदनामी व ब्लॅकमेल करणे इत्यादी बाबतीत सुद्धा गुन्हेगारीचे प्रामाण वाढत आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे आजच्या घडीला षहरी व ग्रामीण भागात याची झळ पोहचल्याचे दिसून येते. सायबर गुन्ह्यामुळे केवळ एक व्यक्ती नव्हे तर उद्योग, सरकारी कार्यालय, सुरक्षा यंत्रणा, बॅंका यांना गंभीर धोका निर्माण झालेला आहे. या संषोधन कार्यात प्रामुख्याने सायबर गुन्ह्याच्या संदर्भात समुदायामध्ये सुधारणा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची गरज व त्याचा सायबर गुन्ह्यावर होणारा परिणाम या संदर्भातील कारणमिमांसेचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यावरून असे दिसून येते की, समुदायामध्ये सायबर जागृतीची मोठ्याा प्रमाणात गरज असून सायबर गुन्हे संदर्भात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून गायी समुह, महाविद्यालये, सरकारी व खाजगी कार्यालय येथे विविध उपक्रमाद्वारे सायबर गुन्ह्याची गंभीरता व दक्षता याविशयी कार्यक्रम घेतल्यास सायबर गुन्ह्याचे प्रमाण थांबविण्याकरीता मदत होईल असे निश्कर्श प्रस्थापित केले आहे.
बीजषब्द – सायबर क्राईम, सायबर समस्या, आव्हाने, जागृती
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0059
Download