सामाजिक जनजागृकतेत समाज माध्यमाचे(सोशल मिडिया) योगदान

सामाजिक जनजागृकतेत समाज माध्यमाचे(सोशल मिडिया) योगदान

कु. करुणा आडे

सहाय्यक प्राध्यापक

मातृ सेवा संघ इन्स्टिट्यूटऑफ सोशल वर्क,

बजाज नगर, नागपूर .

संक्षिप्त

समाज माध्यम  हे एक प्रभावशाली व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे, जे सार्वजनिक जनजागृती आणि सामाजिक विकासावर मोठा प्रभाव टाकते. मनुष्य हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. सुमारे 1983 मध्ये इंटरनेट दैनंदिन जीवनाचा भाग बनू लागले, तेव्हा जागतिक स्तरावर संवाद साधण्याचे नवीन दालन उघडले. पूर्वी शेजाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कुंपणाच्या भिंतीचा आधार घेतला जात असे, परंतु आता त्याची जागा संगणकाच्या, लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनने घेतली आहे.व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणांसाठी असो, संवाद साधणे ही मानवी प्रवृत्ती आहे. हा संवाद नेहमीच सौम्य किंवा सत्य असेल असे नाही, मात्र तो सातत्याने घडत असतो. साध्य स्थितीत जीवनाचा प्रत्येक पैलू माध्यमांच्या प्रभावाखाली आहे. मग ते आपले काम असो, नातेसंबंध असो, शिक्षण असो किंवा मनोरंजन असो समाज माध्यमे प्रत्येक ठिकाणी आपले स्थान निर्माण करून आहेत. माध्यमांशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण झाले आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0049

Download