ग्रामीण विकासामध्ये ग्रामसभेचे योगदान आणि ग्रामपंचायत सदस्यांची भुमिका : एक अध्ययन
प्रा. डॉ. सुनिल व्ही. कोडापे,
कार्यकारी प्राचार्य,
बी.पी. नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ सोशल वर्क, हनुमान नगर, नागपूर 24
मो. 9421710827
Mail id – kodapesunil@gmail.com
प्रस्तावणा
देषाच्या विकासात समतोल आणि संतुलन साध्य करण्यासाठी लोकशाही विकेंद्रीकरण हा एक प्रभावी मार्ग आहे. विकेंद्रीकरण ही लोकशाहीच्या दृश्टीने एक अत्यावष्यक बाब आहे. स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांवर संस्कार करणाÚया पाठषाळा आहेत. भारतासारख्या खंडप्राय, लोकशाहीची प्रदीर्घ परंपरा पाठीशी नसलेल्या देशात तर विकेंद्रीकरणाची नितान्त आवष्यकता आहे. म्हणूनच विकेंद्रीकरण म्हणजे स्वराज्याचे टप्प्याटप्प्याने होणारे प्रकटीकरण आहे असे म्हटले जाते स्थानिक उपक्रमशीलतेला विकेंद्रीकरणाव्दारे चालना मिळते. देशाच्या ग्रामीण भागातील बेकारी, दारिद्रय, अज्ञान व विशमता नश्ट करून ग्रामीण समाज संपन्न बनविण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत करत आहे.
महात्मा गांधीजींचे खेडयाकडे चला हे 70 वर्षापूर्वीचे विचार आज लोकांच्या मनात रूजू लागले आहेत. महात्मा गांधीजींनी भारतात खÚया लोकशाहीच्या स्थापनेची कल्पना केली होती. खरी लोकशाही तंत्रप्रणाली केंद्रीकृत पध्दतीव्दारे चालविली जाऊ शकत नाही. प्रत्येक गावच्या लोकांनी कारभार करावयाचा असेल, ग्राम स्वराज्यात गावातच संपूर्ण सत्ता विकेंद्रित स्वरूपात चालवायची असेल तर शासनात लोकांचा सहभाग असला पाहिजे. तेव्हाच ग्रामीण भागाचा विकास साध्य करता येऊ शकतो. भारतात नागरी प्रशासनापेक्षा ग्रामीण प्रशासन फार महत्वाचे आहे. कारण भारतात आजही शहरांच्या तुलनेत खेडयांची संख्या जास्त आहे. देशात एकूण लोकसंख्येपैकी 72 टक्के लोक खेडयांत राहतात. खेडयात कारभार पाहण्याचे काम ग्रामपंचायतीवर सोपविल्यामुळे आर्थिक विकासात ग्रामपंचायतींना फार महत्व प्राप्त झाले आहे. अर्थात देशातील 72 टक्के लोकसंख्येच्या विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2501I01S01V13P0007
Download