दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांचे आर्थिक व सामाजिक अध्ययन विशेष संदर्भ : गडचिरोली जिल्हा
निलेश अरूण दूर्गे
अर्थशास्त्र विभाग (सहाय्यक प्राध्यापक),
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय,
एटापल्ली, जि.गडचिरोली
मो.नं: 9421115541
गोषवारा :
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा हा बहुसंख्येने आदिवासी आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असल्याने जिल्ह्यात दारिद्रय लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे. जिल्ह्यात जंगल व्याप्त भागावर आधारित मोठे उद्योग नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य दारिद्रय रेषेखालील लोक आर्थिक मागासलेले जीवन जगत आहे तसेच जिल्ह्यात रस्ते आणि वाहतुकीच्या अडचणी सुद्धा आहेत. ज्यामुळे नवीन व्यापार आणि व्यवसायातून रोजगार निर्मितीला चालला मिळताना आर्थिक अडचणी येत आहे.सरकारने पाचव्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटावचा नारा देऊन विविध दारिद्रय निर्मूलनाचे कार्यक्रम सुरू केले. आज सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात भारत सरकार आणि स्वयंसेवी संघटना (एनजीओ) द्वारे विविध योजना राबवून आर्थिक मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील दारिद्र्याची तुलना करता गडचिरोली जिल्ह्यात अधिक दारिद्रय आहे. यामुळे जिल्ह्यातील BPL लोकांचे आर्थिक दारिद्रय दूर करण्याकरिता आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या कमतरतेचे आर्थिकव सामाजिक अध्ययन करण्याची गरज आहे.
बीजशब्द :– दारिद्रय रेषा, दारिद्रय निर्मुलन, आदिवासी, स्वयंसेवी संघटना (NGO)
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0011
Download