थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर

थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर

डॉ. विलास आत्माराम देऊलकर

सहयोगी प्राध्यापक

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविदयालय वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग

ई.मेल – vadewoolkar@gmail.com

सारांश –

            गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड जवळील टेंभू या गावी एका ब्राम्हण कुटूंबात झाला. अत्यंत गरीबीमध्ये त्यांचे शिक्षण झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण कराडला झाले. त्यानंतर ते अकोला येथे मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे पूणे डेक्कन कॉलेजमधून ते बी.ए.ची परीक्षा पास झाले. इ.स. १८८१ मध्ये त्याने एम.ए. ची पदवी प्राप्त केली. लोकमान्य टिकळ व त्यांनी एकत्रित शिक्षण घेतले व शिक्षण क्षेत्रात त्यांनी एकत्र काम केले. परंतू पुढे दोघातही वैचारीक मतभेत वाढत जावून शेवटी आगरकरांनी ‘एकला चलो रे’  हा मार्ग स्विकारला. विधवा विवाह, बालविवाह, विधवांचे केशओपन यासारख्या अनेक विघातक रूढीवर त्यांनी कडाडून टिका केली. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले. त्यांच्या मते मानसिक व शारिरिक क्षीणता, दारिद्रय, पारतंत्र, अंधश्रध्दा, जातीभेद व अनिष्ट चालीरितींनी भारत देशात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी अस्पृष्यता निवडण्यासाठी प्रयत्न केले. जातीभेद वर्णभेद अस्पृष्यता यामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाल्याचे व समाजाचा विकास खुंटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

किवर्ड – आगरकर – सुधारक

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0009

Download