भारतीय स्त्री व महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य

भारतीय स्त्री व महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य

डॉ. कैलाश व्ही. बिसांद्रे

अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क स्टेशन फैल, दयाल नगर, वर्धा-442001

9404822439

Kbisandre81@gmail.com

सारांश : भारतीय  समाजात आणि शैक्षणिक इतिहासात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे अपवादात्मक जोडपे म्हणुन वगळे आहे. स्त्रीपुरूष समानता आणि समाजिक न्यायासाठी चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी खुप मोठा संघर्ष केला. ज्ञान ही शक्ती आहे त्याशिवाय स्त्रियांची प्रगती होणार नाही. तसेच त्यांची प्रगती अशक्य आहे हे त्यांनी ओळखुन संपुर्ण आयुष्य स्त्रिंयांच्या शिक्षणासाठी खर्ची घातले. त्यांची पत्नी सावित्रिबाई फुले या पहील्या महिला शिक्षिका होण्याचा मान त्यांना प्राप्त होता. महात्मा ज्योतीबा फुले  आणि सावित्रीबाई फुले या फुले दांपत्यांनी भारतीय समाजातील महिलांच्या विकासाकरीता फार महत्वपुर्ण कार्य केले. अनेक दृष्ट प्रवृत्तीचा नाश करून समाजाचा रोष पत्करून महिलांना सन्मानाची वागणुक मिळावी म्हणुन मुलीं करीता पहिली शाळा सुरू केली. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातुन खालच्या जाती आणि स्त्रियांच्या उन्नत्तीला महत्व दिले आणि ते साध्य करण्यासाठी आवश्यक पावले उचलली. सावित्रीबाईनी महात्मा फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्यात त्यांना मनापासुन साथ दिली स्त्री उध्दाराच्या कार्यात तर त्यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने वाटा उचलला. स्त्री शिक्षण, अस्पृष्यासाठी शाळा, बाल हत्या प्रतिबंध, अनाथ बालकांचे संगोपन या सारख्या कार्यात त्यांनी ज्योतीबांना निष्ठेने साथ दिली. वेळे प्रसंगी समाजातील निंदा व अवहेलना सहन केली. समाजातील स्त्रिया व खालच्या जातीतील स्त्रियांना शिक्षण देण्याचे कार्य असो किंवा समाजातील वाईट चालीरीती, प्रथा परंपरा होत्या त्यांना दुर करण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले खुप सामाजिक त्रास सहन करावा लागला.

मुख्य शब्द (संकल्पना) स्त्रियांची ऐतिहासीक पार्श्वभुमी,  भारतीय समाज व महिला, मध्ययुगीन राष्ट्रीय समाजामध्ये स्त्रीयांची स्थिती, फुले दांपत्याच्या काळातील भारतामध्ये स्त्रीयांचे स्थान, आधुनीक भारतीय समाजामध्ये स्त्री घातकप्रता, रूढी आणि परंपरा, स्त्री मुक्तीसाठी महात्मा ज्योतीबा फुलेंची चळवळ, स्त्री मुक्तीसाठी सावित्रीबाई फुले.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0007

Download