भारतीय जलविकासाचे जनक : डॉ. बी. आर. आंबेडकर
प्रा. डॉ. आनंदा एम. काळबांडे
सहयोगी प्राध्यापक,
इतिहास विभाग प्रमुख,
सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय
विसरवाडी ता. नवापूर जि. नंदूरबार
ईमेल : anandakalbande75@gmail.com
मो. नं. 9420212103
गोषवारा (Abstract) :
भारतातील जल, विद्युत, पुर नियंत्रण, उद्योग, योजना, नियोजन बाबतचे धोरण विकसीत करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी स्वातंत्र्यपुर्व कालखंडात सन् 1942-46 मध्ये डॉ. आंबेडकर केंद्रात श्रम, जलसिंचन आणि उर्जामंत्री होते. त्या अनुषंगाने युध्दोत्तर काळात जल, विद्युत नियोजनावर त्यांनी भर दिला. त्यामुळेच भारताच्या जलधोरणाची सुरूवात झाली. राज्यांतर्गत नद्यांच्या प्रकल्पाचे जलव्यवस्थापन करण्यासाठी प्रथमत: नदी खोरे प्राधिकरणाच्या (महामंडळ) संकल्पनेचा स्वीकार केला. त्याचा परिणाम म्हणून दामोदर नदी खोरे प्रकल्प आणि हिराकुंड नदी खोरे प्रकल्प तसेच सोन नदीच्या प्रकल्पाचीही सुरूवात डॉ. आंबेडकरांच्या पुढाकारानेच झाली. त्यांनी अखिल भारतीय जलधोरणाची पायाभरणी झाल्यामुळे जलसिंचन आणि विद्युत ऊर्जेची नेत्रदिपक प्रगती झाल्याचे दिसून येते. केंद्रात प्रथमच भारतीय आर्थिक नियोजनाची भूमिका व उद्दिष्टे निश्चित करून जल व विद्युत विकासाची नीति तयार केली. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व संघटना निर्माण करून दामोदर, हिराकुंड व सोन नदीसारख्या जलविकासाच्या धरण योजनेस प्रारंभ केला.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेत आंतरराज्यीय नद्यांच्या विकासासाठी योग्य त्या कायद्याची तरतूद केली. डॉ. आंबेडकरांनी हिराकुंड व दामोदर या दोन मोठ्या बहुउद्देशीय जलप्रकल्पांचा प्रारंभ केला. पुढे पंडित नेहरू ओरिसातील कटक येथील समारंभात म्हणाले की, ही धरणे भारताची आधुनिक मंदिरे आहेत. अशा कार्याची पायाभरणी डॉ. आंबेडकरांनी सन् 1942-46 च्या काळात केली.
बीज संज्ञा (Keyword) : जल, विद्युत, नदी खोरे प्रकल्प.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2411IV04V12P0004
Download