सामाजिक परिवर्तनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका

सामाजिक परिवर्तनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका

प्रा जयंत राऊत
राज्यशास्त्र विभाग प्रमुख,
श्री गणेश कला महाविद्यालय,
कुंभारी, अकोला
बी 7, निसर्गदिप गजानन पार्क जवळ,
तुलशान बंगल्याचेमागे, गितानगर,
अकोला 444 002,  मो 9822697280
 
सारांश
हजारो वर्षे अज्ञान, अन्याय, मानहानी व अत्याचार यांना बळी पडलेल्या अस्पृश्य बांधवांच्या मनात आत्मविश्वासाची भावना निर्माण करून आपल्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्यास त्यांना प्रवृत्त करणारे, त्याकरिता आपले जीवनसर्वस्व वेचणारे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक महान नेतृत्व म्हणजे भीमराव रावजी उर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकरांचा उल्लेख केला जातो. घटना तयार करण्याच्या संदर्भात त्यांनी बजावलेल्या कामगिरीची घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गौरवपूर्ण शब्दात प्रशंसा केली. अस्पृश्यता निर्मूलनाकरिता घटनात्मक तरतुदी करणारे व सामाजिक परिवर्तनाचे आग्रही पुरस्कर्ते म्हणून डॉ. आंबेडकरांचा उल्लेख भारतीय इतिहासात ठळकपणे केला जाईल.

बीज शब्द (Keyword) :  जातीय निवाडा, राखीव जागा, जातीव्यवस्था, सामाजिक परिवर्तन, घटनासमिती, गुलामगिरी, अस्पृश्यता निवारण, घटना समिती, दुर्बल घटक, सामाजिक न्याय,समता, स्वातंत्र्य, बंधूत्व,

DOI link – https://doi.org/10.69758/SJXW7505

Download