भारताच्या इतिहासातील हैदराबाद स्वातंत्र्य लढा : एक अभ्यास

भारताच्या इतिहासातील हैदराबाद स्वातंत्र्य लढा : एक अभ्यास

प्रा.डॉ.शिवचरण एन.धांडे
सहयोगी प्राध्यापक(इतिहास विभाग)
स्व.निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय एकोडी
ता.साकोली जि.भंडारा 441802
Mo:- 9049830803
shavicharandhande@gmail.com

सारांश –
          भारतातील सर्व संस्थाने स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात येणाऱ्या भारतीय संघराज्यात सामील व्हावीत, असा प्रयत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि भारत सरकार करत होते. हैदराबाद, जुनागड, काश्मीर अशा काही संस्थानांनी विलीनीकरणास लवकर संमती दिली नव्हती. हैदराबादच्या निजामाने जाहीरनामा काढून १५ ऑगस्ट १९४७ नंतर आपण स्वतंत्रच राहणार भारत किंवा पाकिस्तान यांपैकी कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही, असे स्पष्टपणे जाहीर केले. भारतात त्याने सामील व्हावे, यासाठी वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या झाल्या. इतर संस्थानांपेक्षा अनेक सवलती देऊनही निजाम सामीली-करणाला तयार झाला नाही. शेवटी २९ नोव्हेंबर १९४७ रोजी आहे ती परिस्थिती एक वर्षापर्यंत कायम ठेवणारा जैसे थे करार करण्यात आला. त्यानंतरही संस्थानात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य निजाम सरकारने बजावले नाही. परिस्थिती अधिक बिघडली, तेव्हा जनतेचे जीवित आणि वित्त यांच्या रक्षणासाठी पूर्वी ब्रिटिश काळात होते, त्याप्रमाणे हैदराबाद शहराजवळच्या छावणीत भारतीय सैन्य ठेवावे म्हणजे शांततारक्षणास मदत करता येईल, असे ठरवून भारत सरकारने पोलीस कारवाई करण्याचा निर्णय घेतला. १४ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे संस्थानच्या तिन्ही बाजूंनी भारताचे सैन्य घुसले. अपेक्षेपेक्षा फारच कमी प्रतिकार झाला आणि अवघ्या चार दिवसांत निजामाच्या फौजांनी शरणागती पतकरली. त्यानंतर निजामाने भारतात सामील होत असल्याचे जाहीर केले आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत दाखल केलेली भारत सरकारविरुद्धची आपली तक्रार परत घेतली. हैदराबाद संस्थान रीतसर भारतात सामील झाले.

मुळ शब्द:– भारतीय संस्थाने, भारतीय संघराज्य, हैद्राबाद स्वातंत्र्य लढा, राजकीय चळवळ, वंदे मातरम् आंदोलन,    जनतेवर दहशद प्रयोग.

Download