जागतिक तापमान वाढ : एक समस्या

जागतिक तापमान वाढ : एक समस्या
 
डॉ. संजय मारोतराव महाजन
अर्थशास्त्र विभागप्रमख
श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय,
कुरखेडा जि. गडचिरोली (महा.)
मो. नं. 9049757160
 
सारांष :-
   जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग ही पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीला भेडसावणारी समस्या आहे. पुरातन कालीन हिम युगापासून तर आजच्या औद्योगिक युगापर्यंत पृथ्वीचे तापमान बदलत आले आहे. बदल हा पर्यावरणाचा स्थायी भाव आहे. यातील काही बदल जलद गतीने होतात तर काही बदल हजारो वर्शाच्या काळात धीम्या गतीने होतात. हवामानात बदल होण्यास नैसर्गिक व मानवनिर्मित दोन्ही स्वरूपाची कारणे जबाबदार आहेत. परंतू आज आपल्याला अस्वस्थ करणारी गोश्ट अषी आहे की मानवी प्रक्रियांमुळे या बदलांना विलक्षण गती प्राप्त झाली आहे. षास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स. 2050 च्या सुमारास पृथ्वीचे सरासरी तापमान 1.50सें.ग्रे. ते 4.50सें.ग्रे. च्या दरम्यान वाढलेले असेल. या वेगवान तापमान वाढीमध्ये हरित गृह वायूंचा फार मोठा सहभाग आहे. उदा. क्लारोफ्ल्युरो कार्बन (CFC),  कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन व ओझन हे वायु उश्णतेचे षोशण करतात. वातावरणात सोडल्या जाणाऱ्या वायुंचे प्रमाण असेच वाढत राहीले तर हवामानात मुलभूत स्वरूपाचा बदल घडून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पृथ्वी उबदार बनत जाण्याच्या या प्रक्रियेलाच ‘जागतिक तापमान वाढ’ असे म्हणतात आणि म्हणून वातावरणातील वाढत्या प्रदूशणामुळे, कर्ब वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचे चित्र भयानक असले तरी ते वास्तव आहे. आपल्या अस्तित्वाचा प्रष्न आता निर्माण झाला आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि हे सर्व आपल्या अवतीभोवती आज आणि आता घडत आहे. पृथ्वीवरचे हे कर्ब संकट आपल्या दारात येवून ठेपले आहे. म्हणून आता तरी जागे व्हा! या कार्बनचे निवारण करावयाचे असेल तर आपल्या हातून होणाऱ्या कर्ब वायूच्या उत्सर्जनाला लगाम घालने ही काळाची गरज झाली आहे.

बीजसज्ञा :-
ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस परिणाम, क्लारोफ्ल्युरो कार्बन (CFC), सुपरसॉनिक, मॉल्ेक्युल, नायट्रस ऑक्साईड (N2O)

Download