रेखाकला, संगीत आणि ललित कला : सौंदर्यदृष्ट्या एकात्मतेचा संशोधनात्मक अभ्यास
मनोज वामनराव चोपडे
संशोधन विद्यार्थी, ललित कला विभाग व छंद मंदिर, रा.तू.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर
मो.नं : ९०२८६११५०६, ई-मेल: manojchopade12@gmail.com
प्रा. डॉ. वैखरी वझलवार
मार्गदर्शीका, (संगीत विभाग प्रमुख) एल. ए. डी. आणि श्रीमती आर.पी. महिला महाविद्यालय, शंकरनगर, नागपूर
सारांश
ललित कलेत रेखाकला व संगीत ही दोन भिन्न माध्यमे असली तरी त्यांचा मूळ उद्देश सौंदर्यानुभूती व भावनिर्मिती हाच आहे. ललित कलेचा विकास हा मानवी सर्जनशीलतेच्या इतिहासाशी निगडित आहे. आदिम गुहाचित्रांपासून ते आधुनिक संगीतमय व बहुअंगी कलेपर्यंत रेखाकला आणि संगीत या दोन मूलभूत माध्यमांनी ललित कलेच्या प्रवासाला दिशा दिली आहे. या शोधपत्रात रेखाकला, संगीत आणि ललित कला यांमधील सौंदर्यदृष्ट्या असलेली एकात्मता अभ्यासली आहे. दृश्य आणि श्राव्य या दोन भिन्न इंद्रियांच्या माध्यमातून होणारी अनुभूती मानवी मनावर समान प्रकारचा भावनिक व सौंदर्यात्मक परिणाम घडवून आणते. त्यामुळे रेषा, रंग, स्वर, ताल व लय हे सर्व घटक सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने एकसंध प्रणाली तयार करतात, हे या संशोधनातून स्पष्ट होते.
कीवर्ड्स: रेखाकला, संगीत, ललित कला, सौंदर्यशास्त्र, एकात्मता, भावदर्शन, कला-विकास
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S02V14P008
Download